ANM होण्याची कारणे व आवश्यक कार्यवाही

१) नवीन कर्मचारी संकेतांक न मिळाल्यास

नवीन नियुक्त कर्मचारी/कामगार यांचा कर्मचारी संकेतांक (Employee Code) उपलब्ध नसेल, तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी परिपत्रक क्र.प्र.ले.(को.)/संगणक/०६/दि.०३.०७.२०१९ अन्वये तातडीने कार्यवाही करावी.

कर्मचारी संकेतांक उपलब्ध नसेल, तर तात्पुरत्या स्वरूपात ९९९९९९९ हा नंबर टाकून बायोमेट्रिक नोंदणी करावी. नंतर प्रत्यक्ष संकेतांक प्राप्त झाल्यावर बायोमेट्रिक विभागाशी संपर्क साधून तो अद्ययावत करावा. यामुळे कर्मचाऱ्याची उपस्थिती ग्राह्य धरली जाईल.

२) एका चौकीतून दुसऱ्या चौकीत बदली झाल्यास

कर्मचारी/कामगार यांची बदली झाल्यास –
कनिष्ठ पर्यवेक्षकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील कामगारांची नोंद SAP प्रणालीत करावी. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बदली झालेल्या कर्मचारी/अधिकाऱ्याच्या कार्यस्थळाची (Location) नोंद करणे आवश्यक आहे.

३) बदली आदेश न पाळल्यास
कर्मचाऱ्याने बदली आदेश पाळला नाही, तर –
त्याला लेखी स्वरूपात कळविणे बंधनकारक आहे. लेखी आदेशामध्ये नमूद करावे की – “बदलीच्या ठिकाणी हजेरी लावणे अनिवार्य असून, आदेश न पाळल्यास पगार बंद करण्यात येईल.”
हा आदेश प्रशासकीय अधिकारी व सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक यांच्या स्वाक्षरीसह काढावा. तरीही कर्मचारी बदली ठिकाणी गेला नाही, तर कनिष्ठ पर्यवेक्षकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना वेतन बंद करण्याबाबत कळवावे.

४) फेसिअल बायोमेट्रिक अडचण
त्याची उपस्थिती Annual Attendance (Zhr_emp_attn) मध्ये नोंदवावी. दर महिन्याच्या १ ते १३ तारखेच्या दरम्यान SAP प्रणालीतील अपूर्ण उपस्थिती Approve करावी. यामुळे भविष्यात ANM समस्या उद्भवणार नाही.

५) फेसिअल मशीन खराब झाल्यास

फेसिअल मशीन दुरुस्त अवस्थेत नसेल, तर –
कनिष्ठ पर्यवेक्षकांनी संबंधित कर्मचाऱ्यांची उपस्थिती Manual Entry (zhr_emp_attn) करून नोंदवावी. ही नोंद फक्त त्याच दिवसापुरती करता येते. नंतर १ ते १३ तारखेच्या कालावधीत या उपस्थितीची Approve प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे.
तसेच मशीन दुरुस्तीबाबत संबंधित विभागास कळविणे आवश्यक आहे.

६) मशीनचा अडचण

मशीन बंद असल्यास, वरील मुद्दा क्र.५ मध्ये नमूद केलेली प्रक्रिया राबवावी.

७) पगार बंद करण्याची स्थिती

कर्मचाऱ्याचा पगार बंद करण्यापूर्वी – ज्या तारखेपासून तो अनुपस्थित आहे तेथून पगार रोखण्याच्या तारखेपर्यंतची ANM नोंद प्रणालीत करणे आवश्यक आहे. त्यानंतर वेतन रोखण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. कनिष्ठ पर्यवेक्षकांनी दर महिन्याच्या १ ते ५ तारखेच्या दरम्यान याबाबतचा अहवाल प्रशासकीय अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात द्यावा.

८) कर्मचारी रजेवर असल्यास
कर्मचारी वैद्यकीय रजा किंवा विशेष रजा वर असल्यास, सर्वप्रथम त्याच्या अर्जित रजा (Earned Leave) दाखल कराव्यात.अर्जित रजा संपल्यानंतर त्याची विशेष रजा/अर्धवेतनी/विनावेतनी रजा प्रणालीत दाखल करावी.

9) कर्मचारी बाहेर ड्यूटी किवा इलेक्शन ड्यूटी वर असला तर त्याचा OD 7 दिवसात आत करण्यात यावा.

निष्कर्ष

मनपा नियमांनुसार सर्व कर्मचारी/कामगारांची उपस्थिती, बदली, रजा व वेतन यांची कार्यवाही वेळेत व योग्य प्रकारे SAP प्रणाली व फेसिअल सिस्टम द्वारे केली जावी. यामुळे ANM समस्या निर्माण होणार नाहीत व प्रशासकीय कामकाज सुरळीत पार पडेल.

ANM Circular

Leave a Comment