BMC कर्मचाऱ्यांच्या बोनसवर सोमवारी होणार मोठा निर्णय– दिवाळीपूर्वी आनंदाची बातमी मिळणार!

मुंबई महापालिकेतील हजारो कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी चांगली बातमी येण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिका कामगार कर्मचारी समन्वय समितिने,
आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांची भेट घेऊन बोनसबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.

समन्वय समितिने सांगितले की,

“दिवाळीच्या चार दिवस आधी बोनस मिळाला पाहिजे, म्हणजे कर्मचाऱ्यांना सणाच्या आधी आर्थिक दिलासा मिळेल.”

आयुक्त गगराणींचे आश्वासन – सोमवारी किवा मंगळवारी निर्णय

या मागणीवर आयुक्त भूषण गगराणी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की,
‘सोमवारी मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री सोबत चर्चा करून बोनसवर निर्णय घेतला जाईल.”
या वक्तव्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत.

₹50,000 सानुग्रह अनुदानाची मागणी – गेल्या वर्षी ₹29,000 मिळाले

समितिने या वर्षी 2024-2025 साठी ₹50,000/- बोनस देण्याची मागणी केली आहे. गेल्या वर्षी फक्त ₹29,000 दिले गेले होते. संघटनेच्या मते, “वाढत्या महागाईचा विचार करता यंदा बोनसच्या रकमेतील भरीव वाढ आवश्यक आहे.”

बैठकीत कोण होते उपस्थित?

या चर्चेत समन्वय समितीचे निमंत्रक आणि नेते उपस्थित होते –

अड. प्रकाश देवदास
बाबा कदम
अड. नवनाथ महारनवर
अशोक जाधव
राजेंद्र मोहिते
दिवाकर दळवी
यशवंत धुरी
प्रकाश जाधव
सहित 22 संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले.

कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

आयुक्तांच्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जर यंदा बोनस ₹50,000 पर्यंत मिळाला, तर तो कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिवाळीचा आनंदाचा क्षण ठरेल.

कोणाला भेटणार बोनस

1) महानगरपालिका नियमित वेतनश्रेणीतील पूर्णवेळ महानगरपालिका कर्मचा-यांना सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी सानुग्रह अनुदान अनुज्ञेय राहील.

2) दि. 1.4.2024 ते 31.3.2025 या कालावधीत प्रत्यक्ष काम केलेल्या दिवसानुसार विविध कारणांसाठी नियुक्त करण्यात आलेले नियमित वेतनश्रेणीतील पूर्णवेळ रोजंदारीवरील, (किटकनाशक विभागातील मुषक संहारक व खारवा) मोसमी हंगामी व खाडा बदली, तदर्थ तत्वावरील कर्मचारी, निलंबित कर्मचारी `यांना यथाप्रमाण (Prorata) सानुग्रह अनुदान सोबतच्या शिघ्रगणकानुसार अनुज्ञेय आहे.

3) दि.1.4.2024 ते 31.3.2025 या कालावधीतील विनावेतनी रजा, रजेविना अनुपस्थिती, अक्षमापित निलंबन कालावधी वगळता सानुग्रह अनुदान यथाप्रमाण (Prorata) अनुज्ञेय आहे.

4) दिनांक 2.4.2024 रोजी किंवा त्यानंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले / स्वेच्छेने सेवानिवृत्त झालेले काम करण्यास वैद्यकीय कारणास्तव असमर्थ ठरविण्यात आलेले मृत्यू पावलेले, इतर संस्थेत प्रतिनियुक्त केलेले महानगरपालिका कर्मचारी सर्वसामान्य अटींच्या अधिन राहून मनपातील सन 2024-2025 वर्षातील सेवेनुसार यथाप्रमाण (Prorata) सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळण्यास पात्र असतील.

कोणाला नाही भेटणार

1) दि.1.4.2024 रोजी वा त्यानंतर नियुक्त झालेले कर्मचारी

2) दि.1.4.2024 पासून वा त्यापुर्वीपासून आजतागायत निलंबनाखाली असणारे कर्मचारी

3) महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयातील विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेतनश्रेणीतील अध्यापकीय कर्मचारी

4) अंशकालीक कामगार/कर्मचारी,

5) मानसेवी कर्मचारी इत्यादी.

Leave a Comment