मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) तर्फे श्रेणी १ ते ४ संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी सेवाजेष्ठता (Seniority List) आधारावर कर्मचारी निवासस्थाने (Staff Quarter) वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी पात्र कर्मचाऱ्यांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
Staff Quarter साठी अर्ज कोण करू शकतो?
- ज्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी परिविक्षाधीन कालावधी पूर्ण केलेला आहे व ते BMC सेवेत कायमस्वरुपी कार्यरत आहेत तो Staff Quarter साठी अर्ज करू शकता.
ज्यांना लाभ मिळणार नाही
- ज्या कर्मचारी/अधिकाऱ्यांच्या नावे, पत्नी/पती किंवा मुलांच्या नावे मुंबई महानगरपालिका क्षेत्रात (कल्याण, वाशी व वसईपर्यंत) स्वतःचे अथवा वहीवाटी हक्काचे घर आहे.
- ज्यांच्याकडे आधीच मनपाचे निवासस्थान आहे किंवा ज्यांनी निवासस्थान स्वीकारण्यास नकार दिला आहे.
- ज्यांनी अद्याप परिविक्षाधीन कालावधी पूर्ण केलेला नाही.
महत्त्वाच्या अटी
- गृहकर्ज घेतलेले कर्मचारीही पात्र असतील. मात्र, त्यांनी घेतलेल्या सदनिकेचा ताबा मिळाल्यानंतर १ वर्षाच्या आत मनपाचे निवासस्थान रिक्त करणे आवश्यक आहे.
- अपूर्ण अर्ज किंवा आवश्यक कागदपत्रांशिवाय आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- उपलब्धतेनुसारच निवासस्थान मिळेल, कर्मचारी पसंतीनुसार निवड करता येणार नाही.
- पात्र कर्मचाऱ्यांनी दिलेले निवासस्थान १० दिवसांच्या आत स्वीकारणे बंधनकारक असेल, अन्यथा त्यांची सेवाजेष्ठता रद्द होईल.
आवश्यक कागदपत्रे
- ओळखपत्र (ID Card)
- आधार कार्ड
- वेतनपावती
- नाडे पावती
- विज बिल
- सेवाभिलेखानुसार पडताळणी केलेली माहिती
अर्ज प्रक्रिया
- अर्ज विहित नमुन्यात संपूर्ण माहिती भरून करावेत.
- अर्ज स्वीकारण्याची मुदत 01.09.2025 ते 30.09.2025 आहे.
- अर्ज फक्त सहाय्यक आयुक्त (मालमत्ता), BMC मुख्यालय, विस्तारित इमारत, ४ था मजला, महापालिका मार्ग, मुंबई-400001 येथे कार्यालयीन वेळेत (सकाळी 11.00 ते सायं. 4.00) प्रत्यक्ष जमा करावेत.
- टपालाने आलेले किंवा अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
विशेष सूचना
- यापूर्वीची प्रतीक्षायादी (Waiting List) रद्द करण्यात आलेली आहे.
- त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी नवीन अर्ज करणे अनिवार्य आहे.
- संबंधित खातेप्रमुखांनी आपल्या खात्यातील पात्र कर्मचारी व अधिकाऱ्यांचे अर्ज वेळेत सादर करण्याची खात्री करावी.
👉 या प्रक्रियेचा उद्देश मनपाच्या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय्य, समान व पारदर्शक पद्धतीने निवासस्थान उपलब्ध करून देणे हा आहे.
Circular आणि Profarma डाउनलोड करा

माझं नाव एन. डी. यादव आहे. मला लेखन क्षेत्रात ६ वर्षांचा अनुभव आहे. माझ्या लेखन प्रवासात मी सरकारी धोरणे, कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांचे हक्क, पेन्शन योजना तसेच जनकल्याणकारी योजना याबाबतची माहिती तुम्हांपर्यंत सोप्या आणि स्पष्ट भाषेत पोहोचवण्याचे कार्य केले आहे.
माझ्या लेखांचा उद्देश लोकांना अचूक, योग्य आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणे हा आहे. मी नेहमी प्रयत्न करतो की माझ्या लेखनातील भाषा साधी-सोप्या स्वरूपाची असावी, माहिती उपयोगी असावी आणि वाचकांना कोणत्याही विषयाचे आकलन करण्यात अडचण येऊ नये.
